Thursday, May 9, 2024
Homeनाशिकसातपूर : अनेक कामगारांचे वेतन वर्ग होण्यास सुरुवात

सातपूर : अनेक कामगारांचे वेतन वर्ग होण्यास सुरुवात

सातपूर : उद्योगक्षेत्राला 22 मार्च पासून बंदचे आदेश लागले सर्वच कारखाने बंद होते त्यामुळे अनेक कामगारांना आपल्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र मोठ्या उद्योगांच्या पुढाकाराने सर्वच कामगारांच्या खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान मांडले असून त्याच्या भितीने संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आले. परिणामी उद्योग क्षेत्रातील सर्वच उद्योग बंद करावे लागले यामुळे कामगारांचे व्यवस्थापनही कंपनीच्या बाहेर आहेत.

- Advertisement -

कोरोना या आजाराच्या भीतीने सर्वच कुटुंब दहशतीत आहेत. दैनंदिन ची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अवांतर खर्चही महिना अखेरीला वाढल्याने कामगारांचे अर्थ नियोजनच कोलमडले आहे. त्यामुळे चालू महिन्याचे वेतन केव्हा व कसे मिळेल याची विवंचना प्रत्येक कामगाराला पडल्याचे दिसून येत होते.

मोठ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापनाच्या प्रतिदिनी वर्क एट होम या संकल्पनेअंतर्गत कामगारांचे वेतनाच्या ताळेबंद घरूनच पाठवल्याने बहुतांशी मोठ्या उद्योगातील कामगारांचे वेतन वर्ग झाल्याचे चित्र आहे. छोट्या उद्योगांमध्ये काही अंशी निर्बंध  असतात.

त्यातूनही काढण्याचा प्रयत्न उद्योजक करीत असल्याने वेतनाच्या काळात कामगारांना अर्थपुरवठा होऊ शकेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.
मासिकातील महिंद्रा, बॉस, एपकॉस यासह विविध मोठ्या उद्योगांनी आपल्या कामगारांना त्यांचे वेतन बँकेच्या खात्यात वर्ग केले असल्याचे दिसून येत आहे

पगारदारांचे हप्ते होणार कट
शासनाने बँकांना दिलेल्या निर्देशानुसार बँकांनी कर्जावरील हप्ते वसुली सक्ती करू नये असे निर्देश दिले आहे मात्र बँकेतून वेतन जमा होणाऱ्या व थेट डिडक्शन दिलेल्या कर्जदारांचे हप्ते आपोआपच खात्यातून वजा होण्याची शक्यता असल्याने वेतन धारकांनी त्यादृष्टीने आपल्या पैशांचं नियोजन करावे असे आवाहन अर्थतज्ज्ञांनी केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या