Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी : महिंद्रा प्लान्टवर लवकरच व्हेंटिलेटरचे उत्पादन; कर्मचाऱ्यांनी तयार केला नमुना

इगतपुरी : महिंद्रा प्लान्टवर लवकरच व्हेंटिलेटरचे उत्पादन; कर्मचाऱ्यांनी तयार केला नमुना

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्राच्या प्लॉटवर व्हेंटिलेटर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आली माहिती चेअरमन आंनद महिंद्रा यांनी दिली आहे.

दरम्यान देशभरातील संस्था, कंपन्यांच्या माध्यमातून कोरोनावर मत करण्यासाठी विविध उपपाययोजना करण्यात येत आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा चे चेअरमन आंनद महिंद्रा यांनी आहे. यासाठी त्यांनी स्वदेशी बॅग व्हॉल्व्ह मास्कचा एक नमुना विकसित केला आहे, जो सामान्यत: अंबू बॅग म्हणून ओळखला जातो. हा नमुना तयार करण्यासाठी ४८ तास लागले असून याची किंमत ७ हजार पाचशे च्या आसपास असू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

- Advertisement -

हा नमुन अविकसित करण्यासाठी मुंबईस्थित कांदिवली येथील कर्मचारी तसेच इगतपुरी येथील कर्मचाऱ्यांनी यावर काम केले आहे. अवघ्या ४८ तासांत ए नमुना तयार करण्यात त्यांना यश आले आहे. पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक सल्याने त्याबाबत पीएमओ कार्यालयाशी संवाद साधनाय्त येत असल्याची माहिती चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

या उपकरणाचा उपयोग श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी वापरली जातो. कृत्रिम मॅन्युअल-ब्रीफिंग युनिट, किंवा अंबू बॅग, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्वासोच्छवास नियंत्रित करण्यावर भर देतो. आनंद महिंद्रा पुढे म्हणाले कि हा उपक्रम गेम चेंजर ठरणार असून यामुळे मोठ्या संख्येने लोकांना मदत केली जाऊ शकते. एकाच वेळी आयसीयू व्हेंटिलेटरच्या स्वदेशी निर्मात्याबरोबर काम करत आहोत. या अत्याधुनिक मशीन्स आहेत. या दोन्ही प्लॉटमधील कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासारखे आहे, लवकरच त्यांच्या मेहनतीला फळ मिळेल अशी आशा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या