जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी; असे आहे बलाबल

जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी; असे आहे बलाबल

नाशिक । जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करण्याचा निर्णय राज्यस्तरीय नेत्यांनी घेतला, मात्र स्थानिक पातळीवर पंचायत समित्यांमध्ये शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास इच्छुक नाही. प्रामुख्याने पंचायत समितीत शिवसेना बहुमतात असताना राष्ट्रवादीची गरजच काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद सुरू झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अडचणीत येतो की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंधरा पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापतींची निवडणूक उद्या मंगळवारी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबवण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही महाविकास आघाडी राहणार असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर नेत्यांकडून त्याला तीव्र विरोध होत आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे.

अनेक पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात असल्याने त्यांना मदतीसाठी आघाडीची गरज नसल्याने सत्तेचे वाटेकरी कशाला? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. निफाड पंचायत समितीमध्ये शिवसेना ही राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. तालुकास्तरावरील राजकारण यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंचायत समित्यांमध्ये ही महाआघाडी राहणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.

असे आहे बलाबल
बागलाण-भाजप-7, काँग्रेस-2, राष्ट्रवादी-2, शिवसेना-1 व अपक्ष-2
मालेगाव- भाजप-6, राष्ट्रवादी-1, शिवसेना-6
देवळा- भाजप-02, राष्ट्रवादी-3, शिवसेना-1,
कळवण- राष्ट्रवादी-6, काँग्रेस-2
सुरगाणा- सीपीएम-5, भाजप-1,
पेठ- शिवसेना-4
दिंडोरी- काँग्रेस-3, राष्ट्रवादी-2, शिवसेना-6, एपक्ष-1
चांदवड- भाजप-3, काँग्रेस-1, राष्ट्रवादी-2, शिवसेना-2
नांदगाव- भाजप-3, शिवसेना-5.
येवला- राष्ट्रवादी-3, शिवसेना-7
निफाड- काँग्रेस-1, राष्ट्रवादी-6, शिवसेना-10, अपक्ष-3
नाशिक- राष्ट्रवादी-5, शिवसेना-2, एपक्ष-1
त्र्यंबकेश्वर- सीपीएम-2, काँग्रेस-1, राष्ट्रवादी-1, शिवसेना-1, अपक्ष-1
इगतपुरी- भाजप-1, काँग्रेस-1, राष्ट्रवादी-1, शिवसेना-7,
सिन्नर- भाजप-4, शिवसेना-8
————————-
…तर बारा पं. स. महाविकास आघाडीकडे
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांपैकी 7 पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात होत्या. चार पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या तर एक माकपच्या ताब्यात होती. एक पंचायत समिती भाजपकडे तर दोन पंचायत समित्या युतीच्या ताब्यात होत्या. आता महाविकास आघाडी झाल्यास बारा पंचायत समित्यांवर त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com