Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआज पासून 12 वीच्या परीक्षेला प्रारंभ; पहिलाच पेपर इंग्रजीचा

आज पासून 12 वीच्या परीक्षेला प्रारंभ; पहिलाच पेपर इंग्रजीचा

नाशिक । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि.18) पासून सुरुवात होत आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळी इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. नाशिक विभागात 1 लाख 66 हजार 718 विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. तर, जिल्ह्यात 75 हजार 343 विद्यार्थी पेपर देणार आहेत. कॉपी प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके तैनात आहेत.

विभागात कला शाखेच्या 66 हजार 718, वाणिज्य शाखेच्या 23 हजार 874 आणि विज्ञान शाखेच्या 69 हजार 337 तर एमसीव्हीएसीच्या 6 हजार 549 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 18 फेबु्रवारीपासून ते 18 मार्च या कालावधीत बारावीचे पेपर होणार आहेत. कॉपी व तणावमुक्त परीक्षेसाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू आहे. तणावमुक्त पेपर देण्यासाठी आठवड्यातून एक दिवस मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गत वर्षी नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात कॉपीचे सर्वाधिक प्रकरणे उघडकीसत्यामुळे यंदा या जिल्ह्यात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कापीमुक्त परीक्षेसाठी संबंधीत केंद्रसंचालकाची विशेष कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन तसेच सूचना पुस्तिकेचे वाटप करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यंदा भरारी पथकांची संख्या देखील वाढण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 95 केंद्रावर परीक्षा
विभागात 234 केंद्रांवर तर जिल्ह्यात 95 तर केंद्रांवर परीक्षा होणार असून तयारी पूर्ण झाल्याचा दावा शिक्षण मंडळाने केला आहे. परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिकचे उ पशिक्षणाधिकाजयांचा समावेश असलेल्या सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या
जिल्हा         विद्यार्थी संख्या       परीक्षा केंद्र
नाशिक         75,343                95
धुळे             25,264                44
जळगाव      49,403                 71
नंदूरबार      16,468                 24

- Advertisment -

ताज्या बातम्या