Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र१४ एप्रिल नंतर लॉकडाऊन वाढवायचा का हे लोकांवरच अवलंबून : उद्धव ठाकरे

१४ एप्रिल नंतर लॉकडाऊन वाढवायचा का हे लोकांवरच अवलंबून : उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील लोकांनी १४ एप्रिल पर्यंत नियमाचे नीट पालन केल्यास लॉक डाऊन वाढवण्याची वेळ येणार नाही, त्यामुळे पुढील परिस्थिती सावरायची कशी हे आता लोकांवरच अवलंबून आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा नागरिकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुकवर लाइव्ह आले होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोना आपली परीक्षा बघतोय, पण हा एक छोटासा जीव आपले काहीही बिघडवू शकत नाही, आत्मविश्वास, धैर्य, संयम बाळगा. हा संयमाचा खेळ आहे, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

सध्या मुंबईत रुग्णांची संख्या वाढते आहे. यासाठी एका विशेष रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, न्यूमोनियाची लक्षणे असतील तर सर्वसामान्य हॉस्पिटल मध्ये जाऊ नका त्याऐवजी कोव्हीड साठी तयार करण्यात आलेल्या चाचणी रुग्णालयात जा. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

दिल्लीतील प्रकरणावर ते बोलताना म्हणाले की, मरकज मधून आलेले सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत, तरीही अन्य कोणी राहिले असल्याची तुम्हाला माहिती असेल तर त्याबाबत सरकारला कळवावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात राजकीय, धार्मिक, क्रीडा संबंधी किंवा कोणताही उत्सव पार पडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या