Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प : अतिविषारी घोणस जातीच्या सर्पाला जीवदान

Share
देवळाली कॅम्प : अतिविषारी घोणस जातीच्या सर्पाला जीवदान Latest News Nashik Life of a Serpent of the Ghonas Variety

देवळाली कॅम्प । शिंगवे बहुला येथील अंबडवाडी परिसरात एका घरासमोर निघालेल्या घोणस जातीच्या सापाला सर्पमित्र विक्रम कडाळे यांनी पकडून जंगलात सोडून दिले.

विक्रम कडाळे यांना शिंगवे बहुला येथील छबू नाना निसाळ यांनी फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र कडाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी रवाना झाले. येथे पोहोचून पाहणी केल्यावर घोणस जातीचा साप आढळून आला. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ या सापास पकडले.

त्यानंतर नागरिकांच्या मनात असलेली सापांविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी सापांविषयी माहिती दिली. त्यानंतर सापाला जवळच्या जंगलात सोडून देण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!