Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : शिवडे परिसरात बिबट्याचा संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Share

सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथील रगंनाथ गोविंद वाघ यांच्या शेडनेट मध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान शिवडे येथील वाघ यांनी एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारले आहे. आज पहाटेच्या सुमारास अन्नाच्या शोधात भक्ष्याच्या शोधात बिबट्या बिबट्या शेडनेट मध्ये शिरला. यावेळी घरातील काही सदस्य मिरची तोडण्यासाठी गेले असता मिरची तोडताना अचानक बिबट्या समोर दिसल्याने सगळ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सावधगिरी बाळगत सर्व सदस्य मुख्य दरवाजातून बाहेर पडले.

त्यानंतर वाघ यांनी कोनंबे बीटचे वनपाल श्री आगळे यांना कळवले. वन मजूर. श्री गणपत मेंगाळ, पंढरीनाथ डावखरे, काळू तुळशीराम तळपे. यांनी शेजारील शेतकरी शिवाजी वाघ, विनोद वाघ, ज्ञानेश्वर वाघ, अंकुश वाघ, प्रशांत वाघ यांच्या मदतीने शेडनेटचा काही भाग वरती करून रस्ता मोकळा करून दिला. बिबट्याला रस्ता मोकळा दिसल्यानंतर त्याने धूम ठोकली.

शेजारीच असलेल्या मकाच्या शेतात जाऊन बसला. यात शेडनेटसह मिरचीचेही नुकसान झाले असून परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!