Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : गणपतबारी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिक भयभीत

त्र्यंबकेश्वर : गणपतबारी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिक भयभीत

नाशिक : त्र्यंबकेश्वर जवळील गणपत बारी परिसरात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने वाहनधारकांसह नागरिक भयभीत झाले आहे

दरम्यान गणपतबारी हे त्र्यंबकेश्वर पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. येथून जव्हार, मोखाडा, हरसुल कडे जाणारा रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे येथून विद्यार्थी, नागरिक, कामगार ये जा करत असतात.

- Advertisement -

सोमवारी (दि. १०) सायंकाळच्या सुमारास येथील नागरिक संदीप गांगुर्डे यास बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा गणपतीबारीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

पिंपळद, सापगाव, काचूर्ली, अंबोली, शिरसगाव या भागातील नागरिक, विद्यार्थी यांना ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र दोन दिवसापासून या भागात बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
-संदीप गांगुर्डे , पिंपळद

- Advertisment -

ताज्या बातम्या