Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : सलग तिस-या दिवशी ओझे येथे बिबट्याचा हल्ला

Share

ओझे : सलग तिसऱ्या दिवशी बिबट्याने ओझे शिवारातील वस्तीवरील हल्ला केला असून यामध्ये एक वासराला जीव गमवावा लागला आहे.

तालुक्यातील ओझे येथील शेतकरी सुखदेव खंडू गोजरे यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. सलग तीन दिवसापासून ओझे परिसरात बिबटयांचे ह्ल्ले होत असताना वनविभाग मात्र काहीच हालचाल करतांना दिसत नाही. गेल्या चार वर्षांपासून या बिबट्याचा वावर या परिसरात असून यावर वेळीच उपाययोजना आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

याआधीही अनेक हल्ले या बिबट्याने केल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने ग्रामस्थांसह प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे वनविभागाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दरम्यान या बिबटयाच्या दहशतीमुळे शेतात मजुर कामाला येत नाही व रात्री शेतीला थ्री फेज विजपुरवठा होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेताला पाणी द्यावे लागत आहे. परिणामी मजुरांसह शेतकरीही भयभीत झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!