प्रवाशांनो! उद्या रेल्वेचा प्रवास टाळा; ‘या’ गाड्या रद्द

प्रवाशांनो! उद्या रेल्वेचा प्रवास टाळा; ‘या’ गाड्या रद्द

नाशिक : ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी, २५ डिसेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दरम्यान उद्या नाताळची सुट्टी असल्याने अनेक गाडयांना गर्दी आहे. विकेंडचा आंनद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागणार आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या असून याद्वारे अनेक चाकरमान्यांचे नियोजन कोलमडणार आहे. तसेच ख्रिसमस निमित्त बाहेर जायचा प्लॅन करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. नेमके २५ डिसेंबरलाच मेगाब्लॉक जाहीर केल्याने रेलवे प्रशासनाला तसेच प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे जर प्रवाशी बाहेर पडत असतील त्यांनी माहिती असणं गरजेचं आहे.

सकाळी ९.४५ ते दु. १.४५ या काळात ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर उभारण्याचे काम करण्यात येईल. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक ५ तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण १६ मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.

दि. २५ या मेल-एक्स्प्रेस राहणार रद्द

• 51154 भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर (24.12.2019)
22102 मनमाड-सीएसएमटी राज्य राणी एक्सप्रेस
• 12110 मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
• 12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस
• 12072 जालना – दादर जन शताब्दी एक्सप्रेस

डाउन एक्सप्रेस गाड्या
• 12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस
• 12109 सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेस
22101 सीएसएमटी – मनमाड राज्य राणी एक्सप्रेस
• 12071 दादर – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
• 51153 सीएसएमटी – भुसावळ पॅसेंजर ट्रेन

दिवा-पनवेल-कर्जत मार्गावर डाऊन एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
11011 एलटीटी- हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस

अप / डाऊन मेल एक्स्प्रेस गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन
• 12140 उत्तर प्रदेश नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस 24.05.2019 रोजी सकाळी 11.05 वाजता नाशिक रोडला पोहोचेल.
• 12139 डाऊन सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 25.12.2019 रोजी नाशिक रोड येथून 18.30 वाजता सुटेल.

रेलेव प्रशासनने याबाबत प्रवाशांना आवाहन केले आहे की, या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. पायाभूत सुविधा राखण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा ब्लॉक अत्यंत महत्वाचा आहे. दरम्यान या ब्लॉकमुळे उपनगरी गाड्यांमध्ये इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दी होऊ शकते. प्रवाशांना विनंती आहे की फूट-बोर्ड, रूफ टॉप आणि लोकल ट्रेनच्या गर्दीमध्ये प्रवास करु नये.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com