नाशकातही विद्यार्थ्यांचा एल्गार; केटीएचएममध्ये निदर्शने

नाशकातही विद्यार्थ्यांचा एल्गार; केटीएचएममध्ये निदर्शने

नाशिक : जे एन यु हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील केटीएचएम महाविद्यालयात विविध विद्यार्थी संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जे एन यु हल्ल्याचा निषेध केला.

दरम्यान दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठात झालेल्या हिंसाचारात विरुद्ध अवघ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. यासंद्दर्भात सर्वत्र नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहे. यावेळी शहरातील छात्रभारती, सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालय बंद पुकारत जोरदार निदर्शने केली. त्याचप्रमाणे महाविद्यलया बँडचं हाकेला प्रतिसाद देत नॅशनल उर्दू शाळा तसेच शहरातील इतर महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आली होती.

तसेच सारडा सर्कल येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात तिरंगा घेत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली देशात येऊ घातलेल्या अघोषित एनआरसी, सीएए विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नॅशनल कॉलेज बंद करून येथील विद्यार्थ्यांनी आपला विरोध नोंदवला.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडली तसेच आज होत असलेल्या कामगार शेतकरी संघटनांचा देशव्यापी संपाला पाठिंबा व्यक्त करत एकजुटीची भूमिका स्पष्ट केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com