Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी : मुंढेगांव येथील जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनी अद्यापही सुरूच; तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी : मुंढेगांव येथील जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनी अद्यापही सुरूच; तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी । राज्यातील सर्व खाजगी कंपन्या बंद करण्याचे आदेश राज्यसरकारने दिल्यानंतरही तालुक्यातील मुंढेगांव शिवारातील जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनी अद्यापही सुरूच आहे. इगतपुरी सीआयटीयु संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉमरेड देविदास आडोळे यांनी कंपनीची उत्पादन प्रक्रीया त्वरीत थांबवण्यात यावी या मागणीचे निवेदन २४ मार्च रोजी इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागीरे यांना दिले आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकुळ घातला असुन आत्तापर्यंत हजारो नागरीकांचा यात बळी गेला आहे. यामुळे सर्वच क्षेत्रातील कंपन्याच्या कामगारांना घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयातील कर्मचारींनी घरीच राहावे असा संदेश देण्यात येत आहे. असे असतांना दुसरीकडे मात्र इगतपुरी तालुक्यातील मुंढेगांव शिवारातील जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनी अद्यापही सुरूच आहे.

- Advertisement -

इगतपुरी सीआयटीयु संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉमरेड देविदास आडोळे यांनी कंपनीची उत्पादन प्रक्रीया त्वरीत थांबवण्यात यावी या मागणीचे निवेदन २४ मार्च रोजी इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागीरे यांना दिले आहे. मात्र २७ रोजीही कंपनीची उत्पादन प्रक्रीया सुरुच असल्याची माहीती समजल्यावर देविदास आडोळे, मच्छींद्र गतीर, चंद्रकांत लाखे, गोपीनाथ गतीर यांनी थेट कंपनीवर जाऊन कंपनी व्यवस्थापनाची भेट घेण्यासाठी गेले होते.

तेथील कंपनी व्यवस्थापनाने भेटण्यास नकार दिल्याने त्यांनी याबाबत उप जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून या कंपनी बाबत माहीती कळवली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने संपुर्ण देशात सरकारने संचारबंदी लागु केली आहे. जिल्हयातील सर्व व्यापारी वर्ग, इतर औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्यानी सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र मुजोरपनाने जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनीचे कामकाज आजही सुरूचं आहे.

कंपनीच्या आत कामगारांसाठी १५० कॉलनी कंपनीने बांधल्या असुन या कॉलनीत २५०० परप्रांतीय कामगार येथे राहात आहेत. याच कामगारांना घेऊन कंपनी सुरु असल्याचा आरोप कॉमरेड देविदास आडोळे यांनी केला आहे. या अडीच हजार कामगारांच्या जिवीताशी खेळ खेळला जात असुन हे काम चालु राहील्यास कंपनीतील सर्व कामगार व मुंढेगाव परीसरातील नागरीकांच्या जिवीतास मोठा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तहसीलदारांनी हस्तक्षेप करून त्वरीत कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या