Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लॉकडाऊन : व्हाट्सअप, यु ट्यूबवरून सुरु आहे आयटीआयचा अभ्यास

Share

नाशिक : तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने यु ट्यूब चॅनेल आणि व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऑनलाईन लर्निंग सुरु केले आहे.

दररोज किमान २ तास होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी सगळ्यात जास्त व्हॉटसअप, त्या खालोखाल सिस्को व्हिडीओ कॉन्फरन्स, झूम एप आणि यु ट्यूबवरील लेक्चर्सचा वापर करत आहेत.

राज्याच्या ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व अमरावती विभागात २८ हजार ५२ शिकविण्या ऑनलाईन घेण्यात आल्याची माहिती राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

२३ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान झालेल्या ऑनलाईन झालेल्या २८ हजार ऑनलाईन लेक्चर्सपैकी तब्बल ऑनलाईनचे, १८ हजार ६४६ लेक्चर्स पाहण्यासाठी ६६. ४७ % विद्यार्थ्यांनी व्हाटसअपचा वापर केला आहे. तर झूम एप्लिकेशनद्वारे १५. ९ % विद्यार्थ्यांनी ४२३३ लेक्चर्स अटेंड केले आहेत. १४. ५७ % विद्यार्थ्यांनी ४०८७ लेक्चर्स यु ट्यूबवर पहिले असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली.

सिस्को व्हिडीओ कॉन्फरन्समधून ०. १३ % विद्यार्थ्यांनी ३६ तर ४७ लेक्चर्स विद्यार्थ्यांनी संचालनालयाच्या ऑनलाईन मोड्यूलद्वारे शिकण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे राज्ययातील आयटीआयचे १०० टक्के विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी विविध पर्यायाद्नवारे ऑनलाईन प्रशिक्षण घेत असल्याची माहिती संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.

व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स देणे, चाचणी परीक्षा आयोजित करणे, बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे परीक्षा घेणे, माहितीची देवाण घेवाण करणे हे नियोजन सहज करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अनेक विद्यार्थी भारत स्किल्स या केंद्र शासनाच्या मोबाईल एप्लीकेशनद्वारे मॉक टेस्टही देत आहेत.

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या एनआयएमआय या संस्थेने त्यांच्या संकेतस्थळावर अनेक विषयांवर ई कन्टेन्ट उपलब्ध करून दिला आहे . त्याचा ही वापर प्रशिक्षणार्थी करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बेस्ट प्रॅक्टिसेस अवगत करणे , प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे नुकसान टाळणे यासाठी संचालकांमार्फत एक दिवसाआड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली जात आहे. या कठीण काळात प्रशिक्षणार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे.

————————————

विभाग – शासकीय आयटीआय – ऑनलाईन लेक्चर्सची संख्या

मुंबई – ६७- ४४३४

पुणे – ६१- ४१३१

अमरावती – ६३- ४४५६

नागपूर -७६- ४६३४

नाशिक – ६८- ३७४९

औरंगाबाद – ८२- ६६४८

एकूण – ४१७ – २८०५२

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!