Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसिन्नर : अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतमालावर संक्रांत

सिन्नर : अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतमालावर संक्रांत

सिन्नर : तालुक्यात रविवारी (दि. २९) सायंकाळी वादळी पावसाने नांदूरशिंगोटे, चापडगाव, गोंदे सह पूर्व भागात हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी कांदे, गहू, मका व द्राक्ष पिकांचे शेतीमालावर संक्रांत येउन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

नांदूर शिंगोटे परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. अर्धा तास सुरू असलेल्या या तांडवाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले. गोंदे, चास , दापुर सह पूर्व भागात वावी पर्यंत वादळाने शेतकऱ्यांची धावपळ उडवली. अनेक ठिकाणी कांदा व गहू काढणीचे काम सुरू आहे. हा शेतीमाल पावसात भिजला. वादळाने उभ्या पिकांना आडवे केले.

- Advertisement -

अनेक द्राक्ष बागांना देखील वादळ आणि पावसाचा फटका बसला. द्राक्ष बागा ऐन बहरात असून वातावरण बदलामुळे त्यांची गुणवत्ता ढासलते आहे. भाजीपाला, टरबूज या पिकांसाठी देखील प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना मुळे भाजीपाला व फळ पिकांना मागणी घटली असून त्यात अवकाळीचे संकट अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना अजूनच अडचणी वाढवणारे ठरले आहे.

गेल्या दोन दिवसांपासुन बाजार समित्या तर दोन आठवड्यांपासून गावोगावीचे आठवडे बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला व नाशवन्त फळ पिके शेतात सोडून देण्याची वेळ बळीराजा वर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या