Thursday, April 25, 2024
Homeनाशिकउद्योगक्षेत्राला गती देउन अर्थचक्राला देणार चालना : उद्योगमंत्री देसाई

उद्योगक्षेत्राला गती देउन अर्थचक्राला देणार चालना : उद्योगमंत्री देसाई

सातपूर : करोनाशी लढा देताना उद्योग चक्रही सुरू करून अर्थ व्यवस्थेला चालना देणे गरजेचे आहे. हे कार्य परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्याने करण्याचा विश्वास महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स तर्फे आयोजित केलेल्या ई-सभेत व्यक्त केला. राज्य भरातील २५० पेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी चर्चेत सहभागी झाले होते.

उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्प डेक्स सुरु करावे ही महाराष्ट्र चेंबरने केलेली मागणी ना. देसाई यांनी मान्य केली. महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या ई-चर्चासत्रात राज्यातील सर्व विभागीय चेंबर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्रीजचे विवेक दालमिया, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. विनोद कलन्त्री, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजु राठी,

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अध्यक्ष श्गिरिधर संगनेरिया, इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष आशिष वेद, एमइडीसीचे रवींद्र बोराटकर चेंबरचे माजी अध्यक्ष मीनल मोहाडीकर, वरिष्ट उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, रविंद्र मानगावे, शुभांगी तिरोडकर, उमेश दाशरथी, अजित सुराणा, सुनीता फाल्गुने, सोनल दगडे, करुणाकर शेट्टी, उमेश पै, सतीश मालू, भारत खंडेलवाल, स्टाईसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी सहभाग घेतला.

एमएसएमई उद्योगांसमोरची आव्हाने भांडवल उभारणी, कामगार नसणे, व्याज दर, बँकाचे कर्ज मिळणे, लाइट बिल, पाणी बिल व विविध कर, कामगारांचे पगार, निर्यातीसाठी चालना मिळावी, त्याकरिता प्रयत्न करणे, कृषी माल काढण्यासाठी मजुरांची उपलब्धता आधी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

उद्योग सुरु करण्यासाठी आजपर्यंत पंचवीस हजारापर्यंत उद्योगांनी परवानगीसाठी अर्ज केले असून, स्वयंचलित दुचाकी वाहनांसाठीचे दहा किलोमीटर बंधन दूर केले आहे. चर्सूचेतून आलेल्या सुचनांचा सकारात्मक विचार करुन उद्योग क्षेत्राला सहकार्य देणार आहे
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या