Type to search

नाशिक

सिन्नर : वडांगळीत डसन डुकरीचे सोंगं नाचवण्याची परंपरा; काय आहे ‘डसन डुकरी’

Share
सिन्नर : वडांगळीत डसन डुकरीचे सोंगं नाचवण्याची परंपरा; काय आहे 'डसन डुकरी' Latest News Nashik Holi Festival Celebrate With Dasan Dukri Cartoons at Vadangali

सिन्नर : तालुक्यातही वडांगळी येथे धुळवडीच्या निमित्ताने डसन डुकरीचे सोंग काढण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत धुळवडीचा आनंद लुटला.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड. या दिवशी ठिकठिकणी वीर नाचवण्याची तसेच मिरवण्याची परंपरा आहे. अशीच परंपरा वडांगळी गावात देखील असून येथे डसन डुकरीचे सोंग नाचण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. सोंगे नाचवताना डसन डुकरीने स्थानिक ग्रामस्थांना केरसुणीने आशीर्वाद देत बिदागी मिळवली. यावेळी बालगोपाळांनी डसनडुकरीच्या पाठीमागे फिरत धुळवडीचा आनंद घेतला. सुरेश कहांडळ डसन तर रवी खुळे डुकरीच्या वेशात होते.

तसेच या दिवशी घरोघरी देवघरातील वीराचा टाक खोबऱ्याच्या वाटीत घालून लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून वीराची वेशभूषा केलेल्या मुलांच्या हाती दिला जातो. शिमग्याच्या दिवशी या वीरांचे पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवत गावात डफाच्या तालावर या बालवीरांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!