Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकदेवळा : साधेपणाने विवाह करीत नवविवाहितांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

देवळा : साधेपणाने विवाह करीत नवविवाहितांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

खामखेडा : यंदाची लग्न सराई इतर वर्षांपेक्षा अनोखी ठरत आहे. अनेकजण साध्या पद्धतीने लग्न करीत फिजिकल डिस्टन्सी पाळत विवाह उरकत आहेत. असाच एक विवाह सोहळा खामखेडा येथे पार पडला आहे.

येथील अश्विनी पाटील व डोंगरगाव येथील वैभव हिरे यांनी लॉकडाऊन च्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता साध्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाडत करोना निधीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजाराची मदत करत सामाजिक दातृत्वाचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

- Advertisement -

या दोघांचा विवाह १० मे रोजी विवाह ठरला होता. मात्र लॉक डाऊन असल्याने प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत दोन्ही कुंटूबियांचा सहमतीने मोजक्या उपस्थितितात विवाह लावण्याचे निच्छित केले.

वैभव हे एम टेक झाले असुन मुंबईत एका चांगल्या कंपनीत अभियंता आहेत. तर अश्विनी देखील बी ई झाली आहे. ह्या नवविवाहित दाम्पत्याने विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळत साधे पणाने विवाह करण्याची इच्छा होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर सदर विवाह खामखेडा येथील मळ्यात मोजक्या दहा ते २० लोकांच्या उपस्थित पार पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या