Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : रेल्वेस्थानकावर परप्रांतीयांची तोबा गर्दी; महामार्गावरून पायपीट

इगतपुरी : रेल्वेस्थानकावर परप्रांतीयांची तोबा गर्दी; महामार्गावरून पायपीट

इगतपुरी : मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर इतर ठिकाणच्या परप्रांतीय कामगार हे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अशातच लॉक डाऊन असल्या कारणाने त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने मुंबई-आग्रा महामार्गाने इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने हे परप्रांतीय जमा झाले आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गोरखपुर काशी एक्स्प्रेस मध्ये ही मंडळी ठान मांडून गाडी हलविण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान कोरोना या जीवघेण्या व्हायरसने सध्या देशात थैमान घातले आहे. या भयंकर विषाणूंच्या प्रार्दुभावाला आळा घालण्यासाठी देशभरात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे राज्यात कामधंद्यानिमित्त आलेल्या परप्रांतीयांच्या हाताला काम नसल्याने व जवळ पैसा नसल्याने मिळेल त्या वाहनाने चोरट्या मार्गाने आपल्या राज्यात आप आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करीत आहे.

- Advertisement -

याच अनुषंगाने मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर इतर ठिकाणच्या परप्रांतीय कामगार हे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असता त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने मुंबई-आग्रा महामार्गाने इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने हे परप्रांतीय जमा झाले चित्र आज पाहावयास मिळाले.

तसेच या लॉक डाऊनच्या काळात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय रेल्वे देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे सर्वच रेल्वे वाहतूक बंद असताना इगतपुरी रेल्वे स्थानकावर उभी असलेली गोरखपुर काशी एक्स्प्रेस मध्ये हे नागरिक ठान मांडून बसले आहेत. या आशेवर की या गाडीने पुढील प्रवास करून आप आपल्या राज्यात गावी जाता येईल. परंतू रेल्वे सेवा बंद असल्याने पुढील सुचना मिळेल तो पर्यंत सोडता येणार नाही असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईकडून येणाऱ्यांची संख्या वाढत असून हे नागरिक सरळ महामार्गाने पायी प्रवास करुन कसारा घाटातून इगतपुरी येथे प्रवेश करीत आहेत. या ठिकाणी घाटनदेवी मंदिरा जवळील असलेल्या जिल्हाबंदी चेकपोस्ट वर एकच गर्दी केल्याने येथे तैनात असलेल्या पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या