Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

प्री-वेडिंगसाठी नाशकातील ‘ही’ हटके ‘लोकेशन्स’ पाहिलीत का?

Share
प्री-वेडिंगसाठी नाशकातील 'ही' हटके ‘लोकेशन्स’ पाहिलीत का? Latest News Nashik Hatke Locations For Pre Wedding In City

नाशिक । गोकुळ पवार :
लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून लग्नाआधीच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी तरुणाईमध्ये प्री-वेडिंगची क्रेझ वाढते आहे. गेल्या काही वर्षात प्री-वेडिंग शूटला फार मागणी वाढली आहे. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणांना पसंती दिली जात आहे. कित्येक जोडप्यांना वाटते की, आपले फोटोशूट एखाद्या हटक्या ठिकाणावर शूट केले जावे यासाठी शहरातील अनेक ठिकाणचे पर्यायही फोटोग्राफर्स सुचवत असतात. नाशकातही प्री-वेडिंग शूटसाठी हटके लोकेशन्स असून या ठिकाणी जाऊन जोडपे आठवणी कॅमेर्‍यात कैद करू शकतात.

लग्नसोहळा म्हटले की, पाहुण्यांची गर्दी, लग्नाची गजबज या गडबडीत नवजोडप्याला फारसा वेळ मिळत नसतो. त्यामुळे लग्न जमल्यानंतर बहुतांश जोडपी पहिल्या भेटीपासूनचा ते लग्न होईपर्यंतचा प्रवास हा एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन ‘प्री-वेडिंग’द्वारे साठवत असतात. त्यासाठी अनेक जोडपे अशा ‘प्री-वेडिंग’ फोटोशूटसाठी शहरातील ठिकाणांना पसंती देत आहेत.

गंगापूर डॅम
नाशिक शहराला पाणी पुरवणार्‍या गंगापूर डॅमवर उत्तम फोटोग्राफी होऊ शकते. गंगापूर डॅमच्या बॅकवॉटर परिसर हा नयनरम्य असल्याने फोटोही उत्तम येतात. शिवाय वातावरण शांत आणि आजूबाजूची हिरवळ आपल्या फोटोला अधिक खुलवत जाते.
तपोवन
तपोवन परिसर धार्मिक स्थळ म्हणून तसेच ते पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळात कपिला-गोदावरी संगमावर येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सूर्यास्त होतानाचे इकडचा व्ह्यूदेखील फोटो शूटसाठी चांगला पर्याय आहे.
बापू पूल/गोदापार्क
तरुणाईसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच बापू पूल किंवा गोदापार्क परिसर होय. एखाद्या नदीकिनारी आणि बागेच्या ठिकाणी जर फोटोशूट करावयाचे असल्यास गोदापार्क आणि बापू पूल उत्तमच आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या फ्रेम्समध्ये फोटो काढायला मिळतील. पण याठिकाणी दिवसभर फार गर्दी असते. त्यामुळे सकाळी लवकर जाऊन फोटो शूट केलेत तर उत्तम होईल.
पांडवलेणी
इ. स. पू. 19 व्या शतकात खोदलेल्या बौद्ध लेणी आहेत. या ठिकाणी प्राचीन लेणी व तसेच बुद्धविहार असून येथे शांत जागा असल्याने येथे तुम्हाला चांगली फोटोग्राफी करता येईल. अनेकदा प्री-वेडिंग शूटसाठी जोडपे पांडवलेणीचा पर्याय निवडतात. येथील लोकेशन्स हटके असल्याने शूटसाठीदेखील उत्तम आहे.
सुला विनियार्डस
नाशिकला ‘वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ची ओळख देणारे ‘सुला वाईन्स’. फोटोशूटसाठी तरुणाईचे फेव्हरेट डेस्टिनेशन म्हणून याची ओळख आहे. येथील निसर्गरम्य परिसर, उत्तम लोकेशन्स यामुळे येथे फोटोग्राफर्सची पसंती असते.
सोमेश्वर
शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण. प्राचीन मंदिर, गोदावरीचा नदीकाठ, सोमेश्वर धबधबा अशी सुंदर ठिकाण या परिसरात आहेत. त्यामुळे प्री- वेडिंग शूटसाठी सोमेश्वर उत्तम आहे. शहराच्या जवळ असल्याने वेळही वाचेल, शिवाय एकही पैसे खर्च न करता फोटोशूट करता येणार आहे.
रामकुंड
शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीचा ठिकाण म्हणजेच रामकुंड होय. या ठिकाणी गर्दी असल्याने फोटोग्राफर्सला कसरतीचे काम करावे लागेल. परंतु त्याच्या हटके कल्पना येथील फोटोशूटला चार चांद लावू शकतात. त्यामुळे एखाद्या जोडप्याने रामकुंड हा पर्यायदेखील आवर्जून पहावा.

नाशकात गेल्या दोन- तीन वर्षांत प्री-वेडिंगची क्रेझ वाढली आहे. स्थानिक फोटोग्राफरसह बाहेरील फोटोग्राफरसही शूटसाठी येथील ठिकाणांना पसंती देत आहेत. येथील वातावरणही फोटोशूटसाठी प्रभावी असल्याने नाशकात येणार्‍यांची संख्या अधिक आहे. प्री-वेडिंगप्रमाणेही इतरही फोटोशूट करण्यावर सध्या फोटोग्राफर्सचा भर आहे.
-तेजस चव्हाण, ग्रेप काऊंटी रिसॉर्ट

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!