Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कोरोना : मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्थांची गुगल स्प्रेडशीटद्वारे नोंदणी : जिल्हाधिकारी सुरज मांढरे 

Share
नाशिक । कोरानाच्या पार्श्वभुमीवर  जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या कामकाजात सुसुत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने एक गुगल स्प्रेडशीट तयार केले  आहे. यात दानशूर व्यक्ती व संस्था लॉगिन करून आपली नोंदणी करू शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करताना जिल्हा प्रशासनास मदत करणारे अनेक हात पुढे सरसावले आहेत. या सर्व व्यक्ती व संस्थांच्या कामात समन्वय रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर ( 95455 73109 यांची नियुक्त केली आहे. त्याच बरोबर दानशूर व्यक्तिंची नोंदणी एकाच ठिकाणी व्हावी, त्याची पुनरूक्ती होवू नये यासाठी डिजिटल स्वरूपात गुगल स्प्रेडशीटचा उपयोग करण्यात येत आहे.
यात व्यक्ती, संस्था, मोबाईल क्रमांक, ईमेल, मदतीचे स्वरूप, वस्तुंचा तपशील, संख्या, ज्या ठिकाणी मदत करावयाची आहे ते ठिकाण, तालुका व मदत पोहच करण्याची तारीख आपल्या अभिप्रायासह नमूद करावयाची आहे.
कृपया आपली नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर 👇टॅप करा…
तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळ
https://nashik.gov.in यावरही  अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी कळविले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!