मालेगाव येथील रुग्णसेवेच्या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद

मालेगाव : तालुक्यातील नागरिकांसाठी हेल्पलाईन सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून या हेल्पलाईन सेंटरचा भ्रमणध्वनी क्रमांक 7507486329 असा आहे.

शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधेविषयी असलेल्या अडचणी व सुविधेविषयी माहिती घेण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आजपावेतो जवळपास ८४ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे हेल्प लाईन सेंटर येथे कार्यरत मंडळ अधिकारी श्री.निकम यांनी आज सांगितले.

शहरातील नागरिकांनी त्यांना असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घ्यावा असेही कळविण्यात आले आहे.

24X7 अविरतपण हेल्पलाईन सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून बहुतेक कॉल्स हे जिवनावश्यक वस्तु, संचारबंदी कालावधीत मिळणाऱ्या सुविधा, कोरोना संदर्भातील प्राथमिक लक्षणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांची माहिती आदि प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण या हेल्पलाईन सेंटरवरुन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील कोविड व नॉन कोविड रुग्णालये

शहरामध्ये नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.

कोविड केअर सेंटर्स साठी माळदे शिवारातील आय.एच.एस.डी.पी. बिल्डींग व मन्सुरा हॉस्टेलचा समावेश करण्यात आला आहे, तसेच डेडिकेटेड कोविड केअर सेंटर्ससाठी मन्सुरा मॅनेजमेंट बिल्डिंग-१, मन्सुरा मॅनेजमेंट बिल्डिंग- २ याचा समावेश आहे.

तर डेडिकेटिड कोविड हाँस्पिटल साठी जीवन हॉस्पिटल व फरहान हॉस्पिटल यांचा समावेश असल्याचे सहाय्यक जिल्हा चिकित्सक डॉ.निखील सैंदाणे यांनी कळविले आहे.