Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘या’ कारणामुळे सोन्याच्या भावात होतेय वाढ

‘या’ कारणामुळे सोन्याच्या भावात होतेय वाढ

नवी दिल्ली । भारतात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 42,790 रुपये तर एक किलो चांदीचा दर 48,376 रुपये होता. आठवडाभरात 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 1,800 रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या या दरवाढीने ग्राहकांसह सारेच अचंबित झाले आहेत. मात्र सोने महागण्याला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

यंदा जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात 7 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. ‘करोना’ आजारामुळे जागतिक विकासावर परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. म्हणून सोने खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘करोना’चा चीनच्या विकासावर विपरित परिणाम झाला आहे.

- Advertisement -

इतर देशांच्या आर्थिक प्रगतीवरही मर्यादा येण्याची शक्यता असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने दिला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. चीनच्या बाहेर करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरक्षित गुंतवणुकीला गुंतवणूकदारांचे प्राधान्य आहे. त्यामुळेच अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने आयात होणार्‍या सोन्याची किंमत वाढली आहे. जीएसटीमुळेही या दरात आणखी वाढ होत आहे.

मुंबईसह देशातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात गेल्या बुधवारी 10 ग्रॅममागे सरासरी 450 रुपयांची वाढ झाली. चांदीचा भावही किलोमागे 500 ते 1,000 रुपयांनी वाढला. गुरुवारी चांदीचा दर 48,600 रुपये किलो होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या