Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शिंदे येथे वाहनाच्या धडकेत बालिका ठार

Share
शिंदे येथे वाहनाच्या धडकेत बालिका ठार Latest News Nashik Girl killed in vehicle crash in Shinde Village

नाशिक । भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.9) सायंकाळी शिंदेगाव येथे घडली.

अश्लेषा शामराव पगारे असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच 15 डीएक्स 6922 क्रमांकाच्या दुचाकीवरुन प्रकाश भाऊराव बोराडे, सुनंदा एस. जगताप आणि अश्लेेषा असे तिघे जात होते.

त्यावेळी समोरुन भरधाव येणार्‍या येणार्‍या छोटा हत्ती वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने प्रकाश बोराडे आणि सुनंदा जगताप हे गंभीर जखमी झाले तर अश्लेषा हिचा मृत्यू झाला. अपघातानंतर छोटा हत्ती वाहनचालक फरार झाला. त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!