Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : मोटार चालू करतांना शॉक लागून मुलीचा मृत्यू

Share
मनमाड : मोटार चालू करतांना शॉक लागून मुलीचा मृत्यू Latest News Nashik Girl Death Due to Electric Shock

मनमाड : पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करतांना विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनमाड जवळील कुंदलगाव येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास हि घटना घडली. गायत्री ज्ञानेश्वर कडनोर असे या मुलीचे नाव असून ती इयता नववीत शिकत होती.

अधिक माहिती अशी कि, मनमाड पासून ९ किमी अंतरावर कुंदलगाव असून सकाळी गायत्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी मोटार सुरू करत असताना तिला विजेचा जबर धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कुंदलगावात शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी चांदवड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!