Friday, April 26, 2024
Homeनाशिकगणेशगाव । जत्रा : गावाकडची माणसं जपणारा सोहळा

गणेशगाव । जत्रा : गावाकडची माणसं जपणारा सोहळा

त्र्यंबकेश्वर : जत्रा म्हटलं कि गावाकडची माणसं,माती आपसूक आठवूं लागतात. शहरातल्या माणसाला गावाकडच्या मातीशी जुळलेली नाळ याद्वारे आणखीनच घट्ट होत जाते. अशीच एक गावाकडची जत्रा म्हणजेच त्र्यंबकेश्वर गणेशगाव येथील गावजत्रा होय. यंदाही उत्साहात हि जत्रा साजरी करण्यात आली.

गणेशगाव(वा) हे जवळपास दोन हजार वस्तीचे गाव. अगदी निसर्गाच्या सानिध्यात व डोंगर कुशीत वसलेले ही दोन्ही गाव. या गावांना लागूनच डोंगरावर दरवर्षीप्रमाणे खंडोबाची यात्रा भरते. १९ व्य शतकाच्या पूर्वार्धात बांधलेलं असून या ठिकाणी दीपमाळ विशेष उल्लेखनीय आहे. एरव्ही शांत असलेला हा गाव मात्र यात्रेच्या दिवसात सारा परिसर माणसांच्या गर्दीने फुलुन जातो. येथे असणारे पुरातन मंदिरही बघण्यासारखे आहे. अगदी दुरदुरून माणसे खास यासाठी यात्रेला दरवर्षी न चुकता येत असतात.

- Advertisement -

नवीन वर्षाच्या पूर्व ध्येला म्हणजे बांगरसाष्टीला जत्रा भरत असते. या जत्रेला डोंगरावरील जत्रा म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी परिसरातील लोकांची वर्दळ ही लक्षणीय असते. यात्रेबरोबरच कुस्त्यांच्या फडही याठिकाणी रंगलेला दिसतो.

एकूणच गावाकडच्या जत्रला अजूनही माणुसकीचे स्वरूप आहे. गावची यात्रा जणू सोहळाच असतो. अनेक ठिकाणी अशा जत्रा लोप पावत चालल्या आहेत. त्यामुळे या जत्रा जपल्या पाहिजेत. गणेशगाव येथील जत्रेला इतिहास आहे. हा इतिहास जतन होणं आवश्यक आहे. जेणेकरून या इतिहासाच्या पाऊलखुणा पुढच्या पिढीपर्यंत पोहचल्या पाहिजेत.

-देवचंद महाले 

- Advertisment -

ताज्या बातम्या