Saturday, April 27, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : गजानन महाराज ट्रस्टकडून ७० बेडचे कोरोंटाईन सेंटर तयार

त्र्यंबकेश्वर : गजानन महाराज ट्रस्टकडून ७० बेडचे कोरोंटाईन सेंटर तयार

त्र्यंबकेश्वर : गजानन महाराज संस्थान ट्रस्ट कडून येथे ७० बेडचे कोरोटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे. शासनाचे तालुका पातळीवरील अधिकारी व आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर यांनी या युनिटला भेट देत पाहणी केली आहे. तसेच ट्रस्टच्या सेवाभावी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वच ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी दक्षता म्हणून त्र्यंबक येथील गजानन महाराज शेगाव संस्थान यांनी ७० बेडचे सुसज्ज असे कोरोटाईन सेंटर तयार केले आहे.

- Advertisement -

देशभरात सध्या लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व धार्मिक स्थळांसह गजानन महाराज मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. असे असतांना
सामाजिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री ग.म. संस्थाननेही प्रशासनाच्या मदतीसाठी सेवाभावनेतून सेवाकार्य सूरू केलेले आहेत. यामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वेगवेगळ्या भागात दररोज ५०० भोजन पॅकेट्सचे वितरण हर्सुल गांव परिसर, आदिवासी पाड्यांवर करण्यात येत आहे.

दरम्यान या युनिटला डॉ योगेश मोरे तालुका वैद्यकिय अधिकारी, डॉ. मंदा बर्वे वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय त्र्यबकेश्वर, डॉ भागवत लोढे, आरोग्य सहाय्यक शिंदे व भनोसे तसेच तहसीलदार दीपक गिरासे, डी वाय एस पी. ढोले यांनी भेट देत पहाणी करीत समाधान व्यक्त केले.

डॉक्टर्स, नर्स व इत्यादी कर्मचारीवृंद यांचेकरीता निवास व्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजन इ सुविधा देता येईल असे कक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या