Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर येथून दोन बसेसद्वारे ४४ मजूर मध्यप्रदेशकडे रवाना

Share

त्र्यंबकेश्वर : येथील बस स्थानकातून मध्यप्रदेशकडे ४४मजुरांना रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून मजुरांची घरवापसी करण्यात येत आहेत. यासाठी त्र्यंबकेश्वर प्रशासनाने पुढाकार घेत मध्यप्रदेशातील ४४ मजुरांनी बसमधून पाठवण्यात आहे आहे. यामध्ये वीटभट्टी व मध्यतरी नाला सोपारा येथून आलेले मजूर होते. दोन बसेसमधून हे प्रवासी घरवापसी साठी रवाना झाले आहेत. अशी माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली.

अद्याप १५ मजूर मध्यप्रदेश ला जाण्यासाठी रेल्वे कडून बुकिंग
झाले आहे. त्यांना बहुदा आज किंवा उद्या रवाना केले जाईल. पुढील सुचनेची वाट महसूल विभाग पहात आहे. शहरात अद्यापही १३ राज्यातून ३५७ मजूर आलेले असल्याची नोंद तहसील कडे आहे. यांच्यातील ४४ जण आज रवाना झाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!