Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात मोफत आँनलाईन वैद्यकीय अत्यावश्यक सेवा; तज्ञ डाँक्टरांचे योगदान

जिल्ह्यात मोफत आँनलाईन वैद्यकीय अत्यावश्यक सेवा; तज्ञ डाँक्टरांचे योगदान

नाशिक  : कोरोनाचा संसर्ग रोखचण्यासाठी शासनाकडून लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामधील संचारबंदिमुळे नागरिकांना घराबहेर पडता येत नाही. तीच स्थिती विविध अजार असणार्‍या रुग्णांची आहे.

अशा रुग्णांना आवश्यक असणारी सेवा घरबसल्या मिळावी यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञ डाँक्टरांनी एकत्र येत मोफत आँनलाईन अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु केली आहे.

- Advertisement -

यामध्ये  ह्रदय रोगतज्ञ, नाक, कान, घसा तज्ञ, फिजिशीयन, हाडांचे तज्ञ, स्रिरोगतज्ञ, फिजीअोथेरेफिस्ट, प्लास्टिक सर्जन, चेस्ट स्पँसिलिस्ट यासह विविध तज्ञांचा सहभाग आहे. हे सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन (अायएमए) शी निगडीत असलेले डाँक्टर आहेत. करोनाच्या आपत्ती काळात सेवाभावातुन हे कार्य हाती घेण्यात आले आहे.  वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यासाठी विविध डॉक्टरांची ऑनलाइन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणत्याही रुग्णास तसे सामान्य नगरीकास कुठलीही दुखापत, आजार, त्रास, इतर शारीरिक व्याधी उद्भवत असल्यास त्या क्षेत्रातील डॉक्टरांशी संपर्क त्यांना साधाता येणार आहे. गरोदर महिलांसाठी सुद्धा ऑनलाइन  डॉक्टर सेवा उपलब्ध आहेत. संपर्क साधण्यासाठी त्या डाँक्टरांचे व्हाँटसअँप नंबर देण्यात आले आहेत.

सेवा हवी असल्यास सर्वप्रथम आपली समस्या टाईप करून अथवा एका कागदावर लिहून त्याचा फोटो संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा लागणार आहे.

दुखापत झाली असल्यास किंवा आवश्यक तेथे दुखापतीचा फोटो काढून संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा. अत्यावश्यक असेल तर फोन करावा. अथवा व्हाटसअँप काँल करुण डाँक्टरांना माहिती द्यावी. ह सर्व त्या त्या डाँक्टरांनी दिलेल्या वेळेतच संपर्क करुन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनआल्याचे  डाँ. राजेद्र नेहते. तसेच प्राचार्य  प्रशांत पाटील यांनी केले आहे.

वरील डॉक्टरांची संपर्क साधल्यानंतर काही अडचण येत असल्यास प्राचार्य प्रशांत पाटील +919545453233 यांच्याशी संपर्क साधावा.

आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु सर्व तज्ञ डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि रुग्ण सांभाळून ही जनसेवा करीत आहे म्हणून कृपया दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा.
– प्राचार्य प्रशांत पाटील, समन्वयक

- Advertisment -

ताज्या बातम्या