Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात आरोग्य विभागाची चार माहिती केंद्रे; ‘ही’ आहेत ठिकाणे

Share

नाशिक । करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. करोना विषाणूबाबतची माहिती, संशयित तसेच आजाराबाबतची अधिकृत माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात चार माहिती केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

जगभरात करोना विषाणूचे थैमान सुरू असून याचा राज्यात तसेच नाशिक जिल्ह्याच्या जवळील जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या दोनशेपेक्षा अधिक झाली आहे. मात्र त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून अनेकांना त्यांच्या घरीच वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यातील जे आजारी पडले अशा 39 जणांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पैकी 31 जणांचे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरीत आठ जणांचे स्वॅबचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्याप तरी जिल्ह्यात करोनाचा रुग्ण सापडलेला नाही. मात्र या विषाणूबाबत सातत्याने समाज माध्यमातून येणारी माहिती व यातून निर्माण होणारे समज-गैरसमज याचा मोठा परिणाम समाजात होत आहे.

अनेक सोशल माध्यमांमधून करोना व्हायरसबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. तर याचा गैरफायदा घेत शहरातील चुंचाळेसह काही ठिकाणी करोनाची लस म्हणून काही महिलांनी पैसे घेऊन बालकांना लस पाजली ज्याच्या परिणामी बालकांना उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. असे प्रकार तसेच अफवा रोखण्यासाठी नागरिकांमध्ये या आजाराची खरी माहिती पोहोचावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे तसेच रुग्णाबाबत माहिती देणे तसेच काही घटनांची सातत्या जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात माहिती केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या माहिती केेंद्रांमध्ये आरोग्य विभागाचे सेवक नागरिकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. तक्रार अगर माहितीसाठी 104 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक केंद्राचा संपर्क क्रमांक असून नागरिक यावर कॉल करून आवश्यक माहिती जाणून घेतील, असा विश्वास डॉ. जगदाळे यांनी व्यक्त केला आहे.

अशी आहेत केंद्र
1) जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक
टोल फ्री क्र. 104
संपर्क क्रमांक – 0253-2572038/2576106
2) नाशिक महानगरपालिका
टोल फ्री. क्र. 104
संपर्क : 0253-2590049

3) जिल्हा परिषद नाशिक
टोल फ्री. क्र. 104
संपर्क : 0253-2508512
4) मालेगाव महानगरपालिका
टोल फ्री. क्र. 104
संपर्क : 0254231818

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!