Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकइगतपुरी : चार ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका; अशी असेल निवडणूक प्रक्रिया

इगतपुरी : चार ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका; अशी असेल निवडणूक प्रक्रिया

कावनई : तालुक्यातील बलायदुरी, भरविर बु., तळोघ, कुर्णोली या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने प्रभावी नियोजन केले असून इच्छुकांनी कागदपत्रे जमण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान एप्रिल २०२० ते जुन २०२० या कालावधीत येथील ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. यामुळे येथील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ६ मार्च ते १३ मार्च पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ मार्चला मतदान तर निकाल ३० मार्चला जाहीर होणार आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक पक्षांच्या हालचालीना सुरवात झाली आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या नोटीसीची प्रसिद्धी २७ फेब्रुवारी करण्यात आली. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ६ मार्च ते १३ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ह्या कालावधीत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी १६ मार्चला सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे.

माघारीसाठी १८ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी १८ मार्चला दुपारी ३ वाजेनंतर होणार आहे. या चार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला सकाळी ७:३० ते ५:३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. इगतपुरी तहसील कार्यालयात मतमोजणी ३० मार्चला करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीची आयोगाने घोषणा केली आहे. तालुक्याचे निवडणूक प्रशासन सक्रिय झाले असून निर्भीड निःपक्षपाती वातावरणात निवडणुका घेण्यासाठी नियोजन पूर्णत्वाकडे आहे. तर संवेदनशील ठीकाणी गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा ठेवणार
– अर्चना पागीरे, तहसीलदार इगतपुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या