Sunday, May 5, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यासाठी १०० बेड्सह साहित्याची मदत

त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यासाठी १०० बेड्सह साहित्याची मदत

नाशिक : गिव्ह सामाजिक संस्थेच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलिकीतुन विविध प्रकारची मदत करण्यात येत असून ग्रामीण भागात करोना विलगीकरण कक्षासाठी त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यासाठी १०० बेड्सह अन्य साहित्याची मदत करण्यात आली आहे. संस्थेकडून जिल्हा परिषदेस दर्जेदार वैद्यकीय साधने दिल्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा लढा अधिक प्रभावीपणे लढण्यात मदत होणार आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने करोनाबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे येत असून त्यांचेकडून विविध माध्यमातून मदत करण्यात येत आहे. त्यातुनच श्री शंकरा हिंदु मिशन, मुंबई यांच्या सहकार्याने काम करीत असलेल्या गिव्ह सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा परिषदेस १०० कॉट मेट्रेस, बेडशीट व उशीसह सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी देण्यात आले.

- Advertisement -

गिव्ह वेलफेयर ऑर्गनाझेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मागील २ महिन्यापासून किराणा किट वाटप, तयार भोजन वाटप, फळवाटप तसेच होमिओपॅथिक औषधाचे वाटप विविध ठिकाणी नागरिक तसेच प्रशासनातील कर्मचारी यांना करण्यात आले आहे. पिपीई किट, सॅनेटायझर स्प्रे, फेस शिल्ड , मास्क, ग्लोव्हस, डेटॉल साबण अश्या प्रकारची मदत संस्थेकडून जिल्हा परिषदेला वेळोवेळी करण्यात आली आहे.

गिव्ह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश अय्यर यांच्याकडून सदरचे साहित्य त्रंबकेश्वर व सुरगाणा येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. गिव्ह संस्थेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भावनेतून सुरू असलेल्या मदतीबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी गिव्ह संस्थेचे आभार मानले असून सामाजिक संस्था ग्रामीण भागात विविध माध्यमातून करीत असलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या