Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच शहरात ‘नो’ पाणीटंचाई; वागदर्डीत ८० टक्के जलसाठा

Share

मनमाड : उन्हाळ्याच्या चाहूल लागताच मनमाड शहरातील नागरिकांना भीती असते ती भीषण पाणी टंचाईची मात्र शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी ८० टक्के भरलेले आहे. धरणात पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे तब्बल ३५ वर्षा नंतर यंदा प्रथमच पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली नसल्याचे पाहून सव्वालाख नागरिकांना मोठा दिलासा मिळून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.पाणी टंचाईचे संकट टळले असले तरी मात्र करोनाच्या रूपाने दुसरे संकट आल्यामुळे नागरिक त्रास झाले आहे

रेल्वेचे मोठे जंक्शन स्टेशन, धान्य साठवणूक करणारे भारतीय अन्न महामंडळाचे आशिया खंडात क्रमांक दोनचे मानले जाणारे डेपो, रेल्वे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्ट सह इतर साहित्य तयार करणारा ब्रिटीश कालीन कारखाना, विविध ऑयल कंपन्याचे इंधन प्रकल्प आदीमुळे देशाच्या नकाशावर मनमाड शहराची आगळीवेगळी ओळख आहे.

त्या पाठोपाठ पाणी टंचाईचे माहेर घर म्हणनू देखील या शहराला ओळखले जाते. पावसा अभावी दरवर्षी उन्हाळ्यात कोरडे पडणारे वागदर्डी, भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खाली जात जावून तळ गाठणाऱ्या विहिरी, बंद पडणारे हात पंप, हपसे व बोरवेल, त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी होणारी अबालवृदांची धडपड असे विदारक चित्र गेल्या ३० ते ३५ वर्षा पासून येथे पहावयास मिळत होते.

दरवर्षी निर्माण होणाऱ्या या पाणीबाणीला कंटाळून सुमारे १० हजार पेक्षा जास्त नागरिकांनी शहराला राम राम ठोकून वेगवेगळ्या शहरात निघून गेले तर येथे मंजूर झालेली औद्योगिक वसाहत केवळ पाण्याअभावी सुरु झाली नाही त्यामुळे शहरात बेरोजगारी वाढली. उच्च शिक्षण घेवून देखील काम मिळत नसल्याचे पाहून हजारो सुशिक्षित तरुण तुटपुंज्या पगारावर इतर शहरात काम करीत आहे.

मात्र यंदा चित्र काहीसे वेगळे असून परतीच्या पावसाने शहर परिसरात इतकी जोरदार हजेरी लावली होती कि प्रथमच शहरातून वाहणाऱ्या रामगुळना व पांझण या दोन्ही नद्यांना पूर नाही तर महापूर आला होता. वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील अतिवृष्टी झाली त्यामुळे धरण केवळ पूर्ण भरलेच नाही तर ३५ वर्षा नानात्र प्रथमच ओवर फ्लो होऊन वाहू लागले.

मनमाडचा पाणी पुरवठा हा पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनावर जास्त अवलंबून आहे. दर महिन्याला पालखेड मधून पाण्याचे आवर्तन सोडले जाते. एकीकडे पावसाने धरण पूर्ण भरले तर दुसरीकडे पालखेड धरणातून नियमित पणे पानायचे आवर्तन देखील मिळत आहे.

त्यामुळे शहरात पाणी पुरवठा केल्यानंतर धरणातील पाणी कमी होताच पालिका प्रशासन आवर्तनाचे पाणी पूर्ण क्षमतेने उचलून पुन्हा धरण भरून घेत होते. त्यामुळे मार्च महिन्यातच जे वागदर्डी धरण कोरडे असायचे आज मे महिन्यात देखील ते धरण सुमारे ८० ते ८५ टक्के भरलेले आहे.

सध्या धरणात पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे यंदा पाणी टंचाईतून सुटका झाली असल्याचे पाहून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे मात्र अचानक झालेल्या करोनाचे आगमन होऊन शहरात तीन रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!