Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : खंबाळे येथील वनविभागाच्या क्षेत्रात आग; दहा हेक्टरवरील झाडे नष्ट

सिन्नर : खंबाळे येथील वनविभागाच्या क्षेत्रात आग; दहा हेक्टरवरील झाडे नष्ट

सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि.५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली.

दातली- खंबाळे दरम्यान वनविभागाचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या पावसाळ्यात यापैकी २५ हेक्टर जागेत वृक्षरोपण करण्यात आले आहे. या झाडांची वाढ देखील चांगली झाली आहे. मध्यरात्री लागलेल्या आगीत लागवड केलेली सुमारे २० हजार झाडे जळाले असुन मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

ही आग नेमकी कशाने लागली याबद्दल वनविभागाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सिन्नर तालुक्यात वनविभागाचे सर्वाधिक क्षेत्र खंबाळेत आहे. या क्षेत्रात चराई बंद असल्यामुळे गवत जास्त आहे.

आग लागल्याची माहिती येथील शेतकरी चिंतामण आंधळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. तो पर्यंत त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या मजुरांना घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

निरोप मिळाल्यावर वनविभागाचे कर्मचारी, गावातील युवक मदतीला धावले. मात्र, पण आगेची भीषणता मोठी होती. अचानक लागलेली आग आटोक्यात आटोक्यात आणताना सर्वांच्या नाकीनऊ आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली मात्र १० हेक्टर क्षेत्रातील हजारो झाडे जळून गेली होती.

आज (दि.६) दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या