Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

महाराष्ट्र असंघटीत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

Share
महाराष्ट्र असंघटीत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील Latest News Maharashtra Financial assistance to unorganized construction workers in Maharashtra Says Minister Dilip Valse Patil

सातपूर : कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन ३ मे २०२० पर्यंत घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झाली असल्याने बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दाेन हजार रुपये आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील १२ लाख नोंदीत बांधकाम कामगारांना होणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.

बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दाेन हजार रूपये आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना आर्थिक मदतदिली जात आहे. ही मदत राज्यातील १२ लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना देण्यात येत असून सदरचे आर्थिक सहाय्य नोंदीत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!