Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगाळामुळे पाच हजार 476 हेक्टरवरील जमीन सुपीक; नऊ हजार शेतकर्‍यांना लाभ

गाळामुळे पाच हजार 476 हेक्टरवरील जमीन सुपीक; नऊ हजार शेतकर्‍यांना लाभ

नाशिक । कुंदन राजपूत
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेंअंतर्गत जिल्ह्यात मोठया प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला असून तो शेतकर्‍यांनी त्यांच्या शिवारात नेला आहे. सन 2017 – 19 या तीन वर्षात एक कोटी 32 लाख 88 हजार क्युबिक घन मीटर इतका गाळ उपसण्यात आला. 9 हजार शेतकर्‍यांनी हा गाळ वाहून नेला. त्यामुळे जिल्ह्यातील 5 हजार 476 हेक्टर जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. या मोहीेमेमुळे पाणीसाठा साठवण क्षमता देखील वाढली आहे.

जिल्हा जल संधारण अधिकारी व मृद जलसंधारण विभागामार्फत राज्यभरात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविली जाते. जिल्ह्यात जिल्हा परिषद, ग्राम ंपंचायत, कृषी व वनविभागामार्फत या योजनेची कामे केली जातात. धरण, बंंधारे, नाले यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा होत आहे. गाळाचे प्रमाण वाढल्याने पाणी साठवण क्षमता दिवसेंदिवस घटत आहे. यावर तोडगा म्हणून शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना अंमलात आणली.

- Advertisement -

त्यात धरण व इतर पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला. मार्च ते मे या कालावधीत बहुतांशी धरणे, बंधारे, नाले कोरडेठाक पडतात. अशा वेळी पोकलंडच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम केले जाते. नद्यांनी वाहून आणलेला हा गाळ अत्यंत सुपीक असतो. जो शेतकरी मागेल त्याला हा गाळा दिला जाते.

शेतकर्‍यांना स्व:खर्चाने हा गाळ वाहून नेतात. या योजनेमुळे धरणे, बंधारे हे गाळमुक्त होत असून गाळ शेतकर्‍यांच्या शिवारात टाकल्याने जमिनीची सुपीकता देखील वाढते. नाशिक जिल्ह्यात मागील तीन वर्षात या योजनेअंतर्गत 1 हजार 956 कामे हाती घेण्यात आली. त्यामाध्यमातून 1 कोटी 32 लाख 88 हजार क्युबिक घनमीटर इतका गाळ उपसा करण्यात आला. साधारणत: 5 हजार 476 हेक्टरवर हा गाळ टाकण्यात आला. या योजनेमुळे धरणे गाळमुक्त होण्यास व शेतजमिनींची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे.

13 हजार सहस्त्र घ.मी पाणीसाठा वाढला
मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आल्याने पाणीसाठवण क्षमतेते देखील वाढ झाली आहे. छोट्या मोठ्या बंधार्‍याची देखील साफसफाई करण्यात आली. एकूण 13 हजार 288 सहस्त्र घन मीटर इतकी पाणी साठवण क्षमतेत भर पडली आहे. तीन वर्षात या मोहीमेसाठी 2 कोटी 2 लाख रुपये इतका खर्च झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या