Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा निर्यातीसंदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा : छगन भुजबळ

कांदा निर्यातीसंदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा : छगन भुजबळ

मुंबई : कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत केंद्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून शेतकऱ्यांनी कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत संयम व शांतता बाळगावी असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

विधानभवनात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नावर माध्यमांशी संवाद साधला. केंद्रसरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. याबाबत आपण शरद पवारसाहेबांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निर्यातबंदी उठवण्याबाबत काम सुरु असल्याचे सांगितले. परंतु कांदा निर्यातबंदी अद्याप सुरु असल्याने व बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचा बाजारभाव घसरत आहे.

याबाबत आपण खासदार शरद पवार साहेबांशी संपर्क साधून केंद्रीयमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात-लवकर कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करणार आहे. त्यामुळे निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा अशी विनंती छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या