Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : भंडारदरवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Share
इगतपुरी : भंडारदरवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू Latest News Nashik Farmer Dies due to lightning at Bhandardarwadi in Igatpuri

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसात विज पडून एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. किसन हनुमंत खाड़े ( वय ६५ रा. भंडारदरावाडी ता. इगतपुरी असे या शेतक-याचे नाव आहे.

दरम्यान (दि. २५) आज दुपारी जेवण करून ते शेताकडे जात होते. पावसाचा अंदाज आल्याने त्यांनी लगबगीने शेतातील कामे आवरुन घेत असताना अचानक विजेचा लोळ त्यांच्या अंगावर येवून पडला. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात एक मूलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

याबाबतची माहिती भंडारदरावाडीचे पोलिस पाटील यांनी घोटी पोलिसांना दिली असुन पंचनामा करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!