Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : बोरटेंभे येथे विजेचा शॉक लागुन शेतकऱ्याचा मृत्यु

Share
इगतपुरी : बोरटेंभे येथे विजेचा शॉक लागुन शेतकऱ्याचा मृत्यु Latest News Nashik Farmer Dies due to Electric Shock at Bhorthembhe in Igatpuri

इगतपुरी : तालुक्यातील बोरटंभे येथील शेतकरी शेतात काम करत असतांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असुन इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, काल रात्री आठ वाजता विठोबा उर्फ योगेश मुकुंद नवले (वय ३०) हा आपल्या टिटोली येथील शेतात रात्री आठ वाजेच्या सुमारास काम करत असतांना विजेच्या तारेचा शॉक लागल्याने औषध उपचाराकरिता त्याच्या चुलत भाऊ सोमनाथ नवले याने इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अतुल ठोकळ यांनी तपासून मृत घोषीत केले.

याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस हवालदार कल्पना जगताप, पी. एन. माळी, पी. सी. भाबड, ए. सी. कोळी आदी करीत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!