Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : शेतीच्या वादातून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Share
पंचवटी : कारचालकाला मारहाण करून लुटले; पाच जणांना अटक Latest News Nashik Beaten and Robbed of Car Driver Five Arrested At Panchavati

सिन्नर : तालुक्यातील दोडी येथे शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.२) सकाळी घडली.

गोरक्षनाथ खंडेराव दराडे (५१) हे त्यांची शेतात काम करत असताना अशोक खंडेराव दराडे, राजेंद्र खंडेराव दराडे, गंगुबाई मारुती दराडे, सुरेखा रमेश आव्हाड, रविना राजेंद्र दराडे, सुशील अशोक दराडे यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून गोरक्षनाथ दराडे यांना लोखंडी रॉड, फावडे, बांबूच्या काठ्यांनी मारहाण केली.

सदरची जमीन माझ्या आजीकडून खरेदीखताने घेतली आहे. या बोलण्याचा राग आल्याने राजेंद्र दराडे व इतरांनी मारहाण केल्याची फिर्याद गोरक्षनाथ दराडे यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली.

सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांच्या आदेशाने वरील सहा जणांविरोधात जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!