नांदगाव : माजी सैनिकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन

jalgaon-digital
1 Min Read

नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील कपिल बोरसे (माजी सैनिक) यांचे काल शुक्रवारी रात्री ओझर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यामुळे साकोरा गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान कपिल हे भारतीय सैन्यदलात इंजिनिअरींग विभागात तब्बल १८वर्ष सेवा करून अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. साकोरा येथील अनेक तरूण सैन्यदलात कार्यरत असून, काही सेवानिवृत्त झाले आहेत. गावांतील बोरसे परिवारातील कै.चिमण रावजी बोरसे यांनी तसेच त्यांची दोन मुले कै.अशोक व श्री किशोर या तिघांनी पोलिस दलात राहून देशाची सेवा केली होती.

त्या अनुषंगाने आपल्या वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, कपिल अशोक बोरसे (३८) यांनी तब्बल १८ वर्ष सैन्यदलात इंजिनिअरिंग विभागात राहून भारतमातेचे रक्षण केले. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच कपिल बोरसे हे सेवानिवृत्त होवून ओझर येथे मुलांच्या शिक्षणासाठी राहत होते. शुक्रवारी रात्री अचानक कपिल बोरसे यांची प्रकृती बिघडली आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, मुलगा- मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या निधनामुळे साकोरा गावांत शोककळा पसरली असून, शनिवारी साकोरा स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *