Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सप्तशृंगी गड : दर्शनासाठी पायी येत असलेल्या भाविकाचा हृदय विकाराने मृत्यू

Share
सप्तशृंगी गड : दर्शनासाठी पायी येत असलेल्या भाविकाचा हृदय विकाराने मृत्यू Latest News Nashik Dying of Heart Disease for a Devotee At Saptsrungigad

सप्तशृंगीगड : सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेंद्र मच्छिद्रनाथ पीजे (वय ४२) असे मृत झालेल्या भाविकाचे नाव आहे.

दरम्यान जळगाव येथील भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी पायी येत असतांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी नांदुरी पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गवळी यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ संबंधित भाविकांच्या कुटुंबीयास संपर्क साधून माहिती दिली.

भाविकाचा मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले. पुढील तपास नांदूरी पोलीस करीत आहे ‘

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!