Friday, April 26, 2024
Homeनाशिकसावधान! इगतपुरी शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर…

सावधान! इगतपुरी शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर…

इगतपुरी : कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराने देशात तसेच महाराष्ट्रात थैमान घातले आहे दिवसेंदिवस या आजारग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना मार्फत आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु तरीदेखील काही नागरिक बेजाबदार पाने शहरात वावरताना दिसतात. त्यांना आळा घालण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान पोलिस प्रशासनाने या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र नागरिकांना आवाहन करित आहे, की स्वताची काळजी घ्या घरीच रहा घरा बाहेर पडू नका आपल्या परिवाराची काळजी घ्या परंतु काही नागरिक पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तरी देखील कित्येक जणांना पोलिसी प्रसाद मिळालेला आहे. तरीही काही नागरिक दवाखाना, भाजी, किराणा चे नाव करून फेरफटका मारायला येतातच काही ही गांभीर्याने विचार केला जात नाही.

- Advertisement -

या कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील उद्भवणार्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाशिक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक डॉ.आरती सींग यांच्या आदेशानुसार इगतपुरी शहरात आज दुपारी २ वाजे पासून संचारबंदी तीर्व करण्यात आली आहे.

जर या पुढे दोन चाकी व चार चाकी वाहने रस्त्यावर दिसली तर ती १५ दिवसां करीता जप्त करण्यात येणार आहे. तसेच आज पासूनड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने सर्वत्र बारीक नजर असणार आहे, असे इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या