Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कोरोना व्हायरस : भीती बाळगू नका, तुम्हाला काहीही झालेलं नाहीय… : मानसोपचार तज्ञ डॉ. जयंत ढाके

Share
भीती बाळगू नका, तुम्हाला काहीही झालेलं नाहीय... : मानसोपचार तज्ञ डॉ. जयंत ढाके Latest News Nashik Dont Panic Your Safe says Psychiatrist Dr. Jayant Dhake

नाशिक । जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसला घाबरून जाण्याचे कारण नाही. स्थानिक प्रशासनाने सांगितलेले नियम पाळल्यास या व्हायरसचा अटकाव करणे सहज शक्य असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. जयंत ढाके यांनी देशदूतला बोलताना सांगितले.

चीनसह जगभरातील ३० देशांमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा फैलाव होत आहे. भारतात देखील या व्हायरसने शिरकाव केला असून या पार्श्वभुमिवर अफवांना ऊत आला आहे. जिकडे तिकडे कोरोना व्हायरसच्या चर्चा सुरू आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु अफवांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल.

कोरोना व्हायरसचा जगभरामध्ये प्रसार होत असला तरी काहीअंशी रुग्णांमध्ये घट होण्यास सुरवात झाली आहे. कोरोना व्हायरस हा थांबविण्यासारखा असून यासाठीच प्रशासनाने चित्रपटगृहे, व्यायामशाळा, सभा, मेळावे, मॉल , शॉपिंग कॉम्प्लेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याद्वारे होणारी गर्दी टाळता येऊन या व्हायरसला अटकाव करता येईल. यासाठी प्रशासनाने काय करावे, काय करू नये अशा सूचना नागरिकांना केल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा, अशा साध्या सूचना पाळावयाच्या आहेत.

सध्या अनेक ठिकाणी मास्क व सॅनिटायसर चा तुटवडा भासत आहे. यामुळे देखील नागरिकांमध्ये भीती आहे. परंतु घाबरून न जाता आपल्या आवाक्यातील गोष्टी पाळण्यावर भर द्यावा. जसे कि, घरांमधील व्यक्तींसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा, आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा, मास्क किंवा सॅनिटायझर नसेल तर दर मिनिटाला हात स्वच्छ धुवा. सध्या वातावरणात बदल होत असल्याने अनेकांना सर्दी, खोकला फ्लू दिसून येत आहे.

कोरोनाची भीती न बाळगता त्याच्या लक्षणांची माहिती करून घेतली पाहिजे. लक्षणांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता योग्य ती माहिती घ्या. कोरोना ग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना होईलच असे नाही मात्र योग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे घाबरून न जाता, नजीकच्या डॉक्टरांना भेट देऊन शंका निरसन करावे. आपल्या मनात भीती न बाळगता, मी स्वस्थ आहे, तंदुरुस्त आहे, मला काहीही झालेले नाहीय, असे सकारात्मक विचार करावे, असे आवाहन यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. जयंत ढाके यांनी केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!