Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककोरोनाच्या भीतीने अनावश्यक खरेदी करु नका… सामाजिक भान जपा

कोरोनाच्या भीतीने अनावश्यक खरेदी करु नका… सामाजिक भान जपा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हराज्य शासनाने महत्वाची सर्व शहरे बंद करण्यात आली आहेत. यामुळे लोंकानी याची धास्ती घेत अनावश्यक खरेदी करण्यावर भर दिला आहे. परंतु असे न करता या काळात आपल्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तू खरेदी करून अन्नाची नासाडी टाळण्यावर भर देऊन सामाजिक भान जपावे असे आवाहन देशदूत मार्फत करण्यात येत आहे.

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व खाजगी व शासकीय कार्यालये, बाजारपेठ, भाजीपाला मार्केट बंद करण्यात आले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूमधील किराणा, दूध, मेडिकल, हॉस्पिटल्स खुली ठेवण्यात आली आहेत. दरम्यान नागरिकांनी कोरोनाच्या धास्तीने किराणा कमी पडू नये यासाठी महिनाभराचा किराणा साठवून ठेवत आहेत. यामुळे लोकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढाच किराणा, भाजीपाला साठवावा जेणेकरून अन्नाची नासाडी होणार नाही.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे सर्व नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अशातच शासनाने घराबहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला नागरिकही प्रतिसाद देत आहेत. पुढील काही दिवस मार्केट तथा इतर सेवा बंद असल्याने नागरिक खरेदीवर जोर देत आहेत. मॉल, भाजीमार्केट, किराणा दुकान येथून नागरिकांनी जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तूची खरेदी करीत आहेत.

शाळा, महाविद्यालये, कार्यालये , कंपन्या बंद असल्याने बहुतांश नागरिक घरी आहेत. अशावेळी पुढील काही दिवस घराबाहेर पडता येणार नाही, या भावनेने नागरिक पुढील महिनाभराचा किराणा खरेदी करीत आहेत. अशावेळी नागरिकांनी कमीत कमी खरेदी करावी. तसेच कुटुंबियांच्या काळजीसह सामाजिक भान जपणे महत्वाचे आहे. राज्यासह देशावर आलेल्या संकटाचा सामना करताना अन्नाची नासाडी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या