Friday, April 26, 2024
Homeनाशिकगिरणारे : गाळोशी येथील ११ विधवा महिलांना किराणाचे वाटप

गिरणारे : गाळोशी येथील ११ विधवा महिलांना किराणाचे वाटप

नाशिक : डॉ बाबासाहेब जयंतीच्या औचित्त्याने इंदिरानगर (गाळोशी) ता.नाशिक या गावातील ११ विधवा भगिनींना जीवनावश्यक किराणा मालाचे पैकींग वाटप करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या महामारीत आदिवासी पाड्यांवरील मजुरी करणाऱ्या गरीब निराधार कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. अशातच सध्या वाढलेल्या लॉकडाऊनमुळे अशा अडचणीतीत असलेल्या परिवारांना घरातील दोन वेळच्या अन्नाची चिंता आहे.

- Advertisement -

गाळोशी येथील विधवा महिलांना ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो खाद्यतेल,१ किलो साखर, चहा, मिरची, हळद, मीठ असे एकत्रित पैकींग त्यांना गावी जाऊन सोशल डिस्टन्स पाळून देण्यात आले.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे सल्लागार गजानन दिपके यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून तसेच पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राम खुर्दळ यांच्या प्रयत्नातून हे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार समशाद पठाण, कीर्तनकार हभप राजाराम महाराज, सामाजिक कार्यकर्ता एकनाथ बेंडकोळी यांच्या हातून हा किराणा वाटप करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या