Sunday, May 5, 2024
Homeनाशिकगिरणारे : महिला बचतगटाद्वारे गरजूंना धान्य, किराणा वाटप

गिरणारे : महिला बचतगटाद्वारे गरजूंना धान्य, किराणा वाटप

नाशिक : कोरोनाच्या संकटातून कोण्हीही उपाशी राहू नये या उद्देशाने ग्रामीण जीवनोन्नती अभियांनातर्गत (उमेद) गिरणारे (ता.नाशिक) येथीलग्रामसंघ व जगदंब बचत गट, मनस्वी समूह गट, समूह संसाधन व्यक्ती नीलिमा कस्तुरे, ग्रामसंघ अध्यक्ष रत्नाताई कापसे यांनी संयुक्तपणे (ता.१) गावातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य, ५० मास्क व किराणा, भाजीपाला वाटप केला. तसेच कुटुंबांना कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

सध्या कोरोनाच्या महामारीमूळ जगभरात आहा:कार सुरू आहे.अश्या स्थितीत आपल्या देशात,राज्यात कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लोकडाऊन सुरू आहे.अश्या स्थितीत कित्येकांच्या हाताला काम नाही,रोजगार थांबला,यामुळं हातावर पोट असलेल्या परिवाराला उदरनिर्वाह भागवण्याची चिंता आहे.अश्या स्थितीत गिरणारे (ता.नाशिक) येथील महिला बचत गटांच्या स्थानिक ग्रामसंघाने गावातील ४ गरजू कुटुंबांना धान्य देण्यात आले तर जगदंब बचत गटाने बसस्थानक परिसरातील चौफुलीनजीकच्या झोपडपट्टीत १३ कुटुंबांना गहू, तांदूळ दिला, तर मनस्वी समूहाने स्वतः बनवलेले ५० मास्क गरजू परिवारांना दिले.

- Advertisement -

यावेळी समूह संसाधन व्यक्ती नीलिमाताई कस्तुरे यांनी स्वखर्चाने घेतलेला किराणा गरजू परिवारांना समसमान वाटप केला. यावेळी सरस्वती खुर्दळ व समूहाने कोरोना रोखण्यासाठी जागृती केली. तसेच या कार्यक्रमात सोशल डिस्टन्स बाबत काळजी घेण्यात आली.यावेळी पोलीस कर्मचारी निलेश गांगुर्डे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या