लॉकडाउनच्या काळात नाशिक विभागात १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्यांचे वितरण

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक : लॉकडाउनच्या काळात कोणतीही व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त अर्जून चिखले यांच्या नियंत्रणाखाली नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यात ३१ मे २०२० पर्यंत ११९ शिवभोजन केंद्रांमधून १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरीत मजूरांची पार्श्वभूमी लक्षात घेता विभागातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पाचपट अधिक थाळ्यांचा इष्टांक वाढवून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुकास्तरावर देखील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नाशिक विभागात १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्हास्तरावर ११ शिवभोजन केंद्रांमार्फत ३ हजार २०० थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावरील ३० शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ३ हजार २०० थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावरील एकूण ४१ केंद्रांच्या माध्यमातून ६ हजार ४०० थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हास्तरावरील १० शिवभोजन केंद्रांमार्फत ६९९ तर तालुकास्तरावरील २२ शिवभोजन केंद्रांमार्फत २ हजार १७० थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात ३२ शिवभोजन केंद्रांमधून २ हजार ८६९ शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २२ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात १० जिल्हास्तरीय शिवभोजन केंद्रांमधून १ हजार ४०० तर तालुकास्तरीय ९ शिवभोजन केंद्रांमधून १ हजार १२५ थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील १९ केंद्रांमधून २ हजार ५२५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

धुळे जिल्हयातील जिल्हास्तरीय ६ शिवभोजन केंद्रांमधून ७२५ व ९ तालुकास्तरीय शिवभोजन केंद्रांमधून ६७५ थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण १५ शिवभोजन केंद्रांमधून १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.

नंदुरबार जिल्हास्तरावरील ३ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून ५०० तर तालुकास्तरावरील ९ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ९०० थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १२ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

नाशिक विभागातील तालुकास्तरावरील एकूण ७९ शिवभोजन केंद्रांमार्फत ८ हजार ७० शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावरील एकूण ४० शिवभोजन केंद्रांमार्फत ६ हजार ५२४ थाळ्यांचे वाटप झाले आहे. त्यानुसार विभागातील ११९ शिवभोजन केंद्रांमार्फत १४ हजार ५९४ थाळ्यांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे.

लक्षणीय :
◼नाशिक विभागात ३१ मे २०२० पर्यंत ११९ शिवभोजन केंद्रांमधून १४ हजार ५९४ थाळ्यांचे वितरण

◼ नाशिक जिल्ह्यात ४१ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ६ हजार ४०० थाळ्यांचे वितरण.

◼ जळगाव जिल्ह्यात ३२ शिवभोजन केंद्रांमधून २ हजार ८६९ शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण.

◼ अहमदनगर जिल्ह्यातील १९ केंद्रांमधून २ हजार ५२५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण.

◼ धुळे जिल्ह्यात एकूण १५ शिवभोजन केंद्रांमधून १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण.

◼ नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १२ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे
वितरण पूर्ण.

◼ नाशिक विभागात तालुकास्तरावरील एकूण ७९ शिवभोजन केंद्रांमार्फत ८ हजार ७० शिवभोजन थाळ्यांचे वितरण.

नाशिक विभागात जिल्हास्तरावरील एकूण ४० शिवभोजन केंद्रांमार्फत ६ हजार ५२४ शिवभोजन थाळ्यांचे वितरण.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *