Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशहरातील व्यावसायिकांच्या मुलांकडून भुकेल्यांना अन्न पाकिटे वाटप

शहरातील व्यावसायिकांच्या मुलांकडून भुकेल्यांना अन्न पाकिटे वाटप

नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटात मदतीसाठी अनेक हात सरसावत असून येथील व्यावसायिक, नोकरदारांची मुलांनी एकत्र येत भुकेल्याना अन्न देण्याचे काम करत आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी तसेच नोकरदारांची तरुण मुले एकत्र येत कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचे ठरवून अभिनव उपक्रमासाठी एकवटले. गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय उत्कृष्ट दर्जाचे दोन वेळेस गरम जेवण गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम नित्याने केले जात आहे. जेवणामध्ये दररोज वैविध्यपूर्ण पदार्थ दिले जातात.

- Advertisement -

हा चमू सर्वप्रथम स्वच्छता आणि निरोगी वातावरणात जेवण तयार करतो. त्यानंतर हे व्यवस्थित पॅकिंग केले जाते त्यानंतर जिथे गरजू, भुकेले नागरिक असतील तिथे हे युवक आपल्या स्वतःच्या वाहनांनी शहरात विविध ठिकाणी हे खाद्य पकेट्स पोहच करत आहेत. इतकेच नव्हे तर गेल्यानंतर कोरोना संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती हे युवक माईकवर देतात आणि त्यानंतर ‘सोशल डिस्टन्ससिंग’ चे नियमांचे पालन करुन हे अन्नपाकीट वाटप केले जातात.

ही सेवा देताना स्वतःची काळजी, निरोगीपणा अबाधित ठेवण्याची काळजी सर्वोच्च स्थानी असतेच. प्रारंभी या समूहाने २०० पॅकेट पासून सुरुवात केली आणि आता सकाळ- संध्याकाळ ८५० पॅकेट्स गरजूना पोहचली जातात.

उपक्रमात ‘नेरकर प्रॉपर्टीज’चे अभय नेरकर, विपुल नेरकर, तुषार भागवत, ‘खरवस किंग’चे हर्षल वरखेडे, ऋषिकेश शिंदे, शुभम वाघ, विक्रांत सोनवणे, मयुर मालपाठक, अथर्व कुलकर्णी, ऋषिकेश कदम, सागर ठाकरे, कुणाल वाणी, अमित खेमानी आदि युवक योगदान देत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या