Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी : स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून जबाबदारीची टाळाटाळ

इगतपुरी : स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून जबाबदारीची टाळाटाळ

इगतपुरी : दोन दिवसांपुर्वीच इगतपुरीत कामगारांचा मोठा जथ्था मुंबईहून नाशिकच्या दिशेने आला. यावेळी पोलिस आणि प्रशासनाची मोठी भांबेरी उडाली. जवळ जवळ चार हजार कामगारांचा हा मोठा जथ्था नियंत्रीत करण्यात प्रशासन व पोलिसांना अपयश आल्याचे आता समजते. जिल्हा हद्दीत प्रवेशबंदी असतानाही इगतपुरीतील चेकपोस्ट ओलांडून ट्रक नाशिकच्या दिशेने जात आहेत. मागिल तीन दिवसांपासून नाशिक अंबड येथे या ट्रक आडवल्या जात आहे.

त्यातच इगतपुरीत अडविण्यात आलेल्या कामगारांपैकी एकही कामगार सध्या इगतपुरीत तयार केलेल्या शेल्टर मध्ये नाहीत. विशेष म्हणजे पोलिस आणि प्रशासन दोघांनाही या कामगारांचा ठामपत्ता नाही. विशेष म्हणजे पोलिस आणि तालुका प्रशासन दोघांनाही याबद्दल माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांनी अशा कामगारांची व्यवस्था आहे त्या ठिकाणी प्रशासनाने करावी असे आदेश दिले. मात्र इगतपुरीत तालुका प्रशासन व पोलिसांनी जबाबदारी झटकत याकडे दूर्लक्ष केले.

- Advertisement -

तहसीलदार अर्चना भाकड यांना या विषयाची विचारणा केली असता शेल्टरमधे एकही व्यक्ती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंबधी इगतपुरी पोलिस अधिकाऱ्यासोबत संपर्क साधावा असे सांगीतले. दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की, आदेशानुसार सुमारे २०० कामगार अडविण्यात आले होते, मात्र प्रशासनाच्या सांगण्यानुसार या कामगारांना पुन्हा मुंबईकडे पाठवण्यात आले, असे पोलिसांचे म्हणने आहे.

एकिकडे नाशिक शहरात रोजच या विस्थापित कामगारांची संख्या वाढत आहे. रोजच तीन ते चार ट्रक नाशिकमध्ये पकडले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या