Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या पारावरच्या गप्पा : लग्न आहे घरच… होऊ दे खर्च

 पारावरच्या गप्पा : लग्न आहे घरच… होऊ दे खर्च

(दाम्या , तुळश्या, संत्या, भग्या, सोम्या, संदीप व इतर शहाणी मंडळी बसलेली )

तुळश्या : काय, म संदीपराव औंदा वाजणार तर?
संदीप : हा , घरची म्हणत्यात , मग बघू आता
दाम्या : व्हय, तसबी तू अजून शिकतोस नव्ह ?
तुळश्या : अर, दाम्या त्याला काय शिकायची गरज हाय, बापानं एवढं कमवून कशापाई ठेवलंय..
दाम्या : व्हय ते बी हाय म्हणा, पण आपल्या खालच्या आळीची पोर अभ्यासाला जात्यात, तसा संदीप जात न्हाय नव्ह, म्हणून इचारलं… अन शिकलं बी कूड वाया जातंय ?

- Advertisement -

संदीप : अय, दामू मला काय दुधखुळा समजला काय, मी कायबी करीन , तुया बापाचं काय जातंय…
दाम्या : (मनातल्या मनात) खरं हाय मह्या बापाचं काय जातंय म्हणा ..
दाम्या : अर तस नव्ह, तुहं चांगलाच व्हनार यात शंका न्हाय..
संदीप : व्हय, तर चांगलंच टोलेजंग लग्न करणारं, अख्खा गावं पाहत राहील..
तुळश्या : व्हयं, व्हयं, तुझं लगीन झ्याक व्हनार बघ, समदा गावं तोंडात बोट घालील….
संदीप : चला येतु म्या (तेवढ्यात संत्या, भग्या, तान्या पारावर येत्यात. )
संत्या : तुळश्या काका , काय म्हण रे तो संदिप्या?

तुळश्या : त्याच काय बबा, मोठ्या लोंकाच्या मोठ्या बाता… लगीन हाय लवकरच, ते पण हायफाय..
संत्या : आता, काय बापाकडं मोकार पैसे असल्यावर हायफाय करणारच..
भग्या : लगीन म्हटलं कि खर्च आलाच….
संत्या : अर पर त्यासाठी पैसा नको का? बिनापैसाची हायफाय लग्न व्हत्यात व्हय..
सोम्या : अर बिनपैशाची का लग्न होत नाहीत का? केवढा खर्च ..

संत्या : हे पण खरं हाय म्हणा, तान्याच्या बापानं संगीच्या लग्नासाठी लाख रुपयांचे कर्ज काढून लगीन केल. पण केलं…
सोम्या : अन आता, ज्याच्याकडून कर्ज घेतलं जातोय त्याच्याकडं मजुरीसाठी…. लग्न म्हणजे नुसता प्रतिष्ठेचा विषय झालाय.. जात तो नुसता त्याच्यापेक्षा आपलं किती भारी हे सांगण्यात व्यस्त आहे…
संत्या : खरं हाय..

सोम्या : अरे, काल मी एका लग्नाला गेलो होतो, टोलेजंग लग्न, हे लायटिंग, हे पाहुण्यांना फेटे, जेवणाला पंच पकवान.. अन लोक किती शंभर ते दोनशे… जवळजवळ २०० ते तीनशे लोकांचे जेवण फेकून द्यावं लागलं, एवढं हायफाय? आपल्याला न्हाय पटलं..
भग्या : गावाकडं त न्हाय, पर शहरात अशी अनेक लोक उपाशीपोटी झोपत्यात, त्यांना द्याया काय व्हतंय ..
सोम्या : व्हय तर, एवढं अन्न वाया घालविण्यापेक्षा भुकेल्यानां द्या, साध लग्न करण्यात काय प्रॉब्लेम आहे.

संत्या : माझा एक पुण्याचा मित्र आहे, त्याने अवघ्या दीडशे रुपयात लग्न करून मोकळा झाला, अन अनाथ आश्रमाला जेवण दिल..
सोम्या : मग, करायला घेतलं तर सगळं होईल पण लोकांची, समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. एवढा मोठ खर्च करून काहीही साध्य होत नाही… सरळ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले पाहिजे. यातूनच समाजाची मानसिकता बदलायला सुरवात होईल….

- Advertisment -

ताज्या बातम्या